update

केंद्रीय नीती आयोग योजनेची समिक्षा करत आहे. किती जणांना खरंच योजनेचा लाभ मिळाला आणि किती बोगस लाभार्थी योजनेत दाखल झाले याचे ऑडिट सुरु झाले आहे. या योजनेचा गैर फायदा घेणाऱ्या काही शेतकऱ्यांसाठी ही योजना अडचणीची ठरली आहे. ज्यांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा हप्ता लाटला, त्यांच्याकडून आता दोन हजारांची वसुली करण्यात येत आहे.

 

या यादीत नाव असेल तरच होणार 17 वा हप्ता खात्यात जमा

 

योजनेत मोठ्या बदलाची शक्यता

केंद्रीय नीती आयोग या योजनेची समिक्षा करत आहे. या योजनेने उद्दिष्ट्य साध्य केले की नाही. या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला. या योजनेत लाभ देताना काही गडबड झाली का? पी एम किसान योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहचला की नाही, हे आयोग तपासणार आहे. त्याआधारे काही सूचना आणि सल्ला देण्यात येईल. ही योजना बंद होणार का, याविषयी अजून काहीच समोर आलेले नाही. पण योजनेत मोठे बदल दिसू शकतात.