rbi

मिनिमम बॅलेन्सवर आरबीआयचा नियम

आरबीआयने २०१४ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एखादा ग्राहक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवत नसेल तर अशा स्थितीत बँकांनी ग्राहकांना तत्काळ माहिती द्यावी. बँकांनी ग्राहकांना बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची माहिती द्यावी लागेल. तसेच किमान शिल्लक न ठेवल्यास बचत खात्यातून केवळ शून्य होईपर्यंत दंड आकारले जाईल पण शिल्लक मायनस होणार नाही याची खात्री करावी.

बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास दंड आकारण्याऐवजी बँका अशा खात्यांवर उपलब्ध असलेल्या सेवा बंद करू शकतात आणि मिनिमम बॅलेन्स जमा केल्यावर सेवा पुनर्संचयित केल्या जाऊ शकतात. तसेच एखाद्याला बँक खाते बंद करायचे असेल तर बँकांना पूर्णपणे विनामूल्य बंद करावे लागेल. म्हणजेच बँका तुमच्याकडून यासाठी शुल्क आकारू शकत नाहीत.

मूलभूत खाते तयार करण्याचा पर्याय

अशा प्रकारणांमध्ये बँकांकडे असणारा दुसरा पर्याय म्हणजे ग्राहकांच्या संमतीने अशा खात्यांचे मूलभूत बचत खात्यात रूपांतर करू शकतात ज्यामध्ये लोकांचे बचत खाते शून्य शिल्लकवर काही किरकोळ सुविधांसह चालू राहते.