सोने-चांदी झाले स्वस्त जिल्हयानुसार दर चेक करा

gold price today : या महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यातील शेवटच्या सत्रात दरवाढीला ब्रेक दिल्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूत शांतता आहे. असे आहेत बेशकिंमती धातूंचे दर?

 

👉 सोने-चांदी झाले स्वस्त जिल्हयानुसार नवीन दर चेक करा 👈

 

मार्च, एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्यात सोने आणि चांदीने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले. मे महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत मौल्यवान धातूत मोठी उलाढाल झाली नाही. पण अक्षय तृतीयेनंतर भाव गगनाला भिडले. सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला. तर चांदीने 96 हजारांचा टप्पा गाठला. दोन्ही धातूंच्या दमदार कामगिरीमुळे ग्राहकांचे अवसान गळाले. पण मागील आठवड्यात आणि चालू आठवड्यात सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. आता अशा आहेत बेशकिंमती धातूच्या किंमती

 

👉 सोने-चांदी झाले स्वस्त जिल्हयानुसार नवीन दर चेक करा 👈

 

दोन दिवसांत मोठा दिलासा

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 2700 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात सुरुवातीला सोने 750 रुपयांनी वधारले. 27 मे रोजी 270, 28 मे रोजी 220 तर 29 मे रोजी 270 रुपयांची दरवाढ झाली. 30 मे रोजी मौल्यवान धातू 440 रुपयांनी स्वस्त झाला. शुक्रवारी किंमती जैसे थे होत्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

👉 सोने-चांदी झाले स्वस्त जिल्हयानुसार नवीन दर चेक करा 👈

 

दोन दिवसांत चांदी 2200 रुपयांनी घसरली

या आठवड्यात चांदीने तीन दिवसांत 6 हजारांची मुसंडी मारली. 27 मे रोजी 1500 रुपये, 28 मे रोजी 3500 रुपये तर 29 मे रोजी 1200 रुपयांनी चांदी महागली. 30 मे रोजी चांदी 1200 रुपयांनी उतरली. तर 31 मे रोजी त्यात 1000 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आहे.

👉 म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; नवीन नियम लागू

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,356 रुपये, 23 कॅरेट 72,066 रुपये, 22 कॅरेट सोने 66,278 रुपये झाले. 18 कॅरेट 54,267 रुपये, 14 कॅरेट सोने 42,328 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,449 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

👉 पैसा ठेवा तयार, लवकरच मालामाल होण्याची संधी मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचा आयपीओ येणार

हॉलमार्कनुसार कॅरेट

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

 

👉 सोने-चांदी झाले स्वस्त जिल्हयानुसार नवीन दर चेक करा 👈

Leave a Comment