१ जून पासून हे ५ नियम लागू, सर्वांसाठी महत्वाचं 👇


एलपीजी सिलेंडरची किंमत

तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडर (LPG Cylinder Price) च्या किमती अपडेट करतात. मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली. घरगुती सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 1 जून 2024 रोजी अपडेट केल्या जातील.

बँकांना सुट्टी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, बँका जूनमध्ये 8 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. ईद सारख्या इतर सुट्ट्यांमुळे जूनमध्ये बँका बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी नक्कीच तपासा.

वाहतूक नियमांमध्ये बदल

1 जूनपासून वाहतूक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम पुढील महिन्यापासून लागू होतील. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला मोठा दंड भरावा लागेल.

नव्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीने अतिवेगाने गाडी चालवली तर त्याला 1,000 ते 2,000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

त्याचबरोबर लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. याशिवाय चालकाने हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावता गाडी चालवली तर त्याला 100 रुपये दंड भरावा लागणार आहे

आधार कार्ड अपडेट

UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जूनपर्यंत वाढवली आहे. आधार धारक सहजपणे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकतात. ऑफलाइन अपडेटसाठी म्हणजेच आधार केंद्रावर जाण्यासाठी प्रति अपडेट 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास 25 हजार रुपये दंड भरावा लागेल

भारतात ड्रायव्हिंगचे वय 18 वर्षे आहे. अल्पवयीन, म्हणजे 18 वर्षाखालील अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास त्याला मोठा दंड आकारला जाईल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्याला 25 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. याशिवाय, अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.